दोन तीन दिवसांच्या तापाने गौरव अगदी थकून गेला होता. त्याला थकवा आला होता, अन्नावर वासना नव्हती. त्याचे आई बाबा खूप काळजी करीत होते. पण अशा वेळी आठवले की, उपचारापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय योग्य.
कधी पाऊस, कधी ऊन, तर कधी थंडी, या दिवसात सततच्या बदलत्या हवामानामुळे व्हायरल तापाचा धोका निर्माण झाला आहे. हवामानातील बदलामुळे व्हायरल इन्फेक्शनचा धोका वाढतो, यात सर्वात सामान्यपणे जास्त ताप येतो. व्हायरल इन्फेक्शन्सची सर्वात वाईट गोष्ट म्हणजे ते एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीकडे पटकन पसरते, म्हणजेच ते संसर्गजन्य असतात. अनेकदा लोक सामान्य ताप आणि व्हायरल ताप याबद्दल गोंधळून जातात आणि त्यातील फरकच ओळखू शकत नाहीत. अशावेळी व्हायरल तापाची लक्षणे जाणून घेणे महत्वाचे आहे.
लहान मुले, वयोवृद्ध लोकांनाही विषाणूजन्य ताप येण्याची शक्यता असते कारण त्यांची प्रतिकारशक्ती तुलनेने कमी असते. ताप हा स्वतःच एक आजार नसून व्हायरल इन्फेक्शन चे एक महत्त्वाचे लक्षण आहे. विषाणूजन्य संसर्ग शरीराच्या कोणत्याही भागात, आतडे, फुफ्फुसे, वायुमार्ग इत्यादींमध्ये होऊ शकतो.
खरे तर पालक मुलांसाठी शक्य तेव्हढी सगळी काळजी घेतात. तरी असे दिसते की, मुले आजाराला बळी पडतात. आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य असलेल्या या युगात, आरोग्य राखण्यासाठी विषाणूजन्य ताप रोखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.यासाठी घरी विषाणूजन्य ताप रोखण्यासाठी स्वच्छता आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. अशाप्रकारे दैनंदिन दिनचर्येत विषाणूजन्य आजारांचा उद्भव व संसर्गाचा धोका कमी होतो.
व्हायरल ताप कोणाला होतो?
१) संक्रमित किंवा आजारी व्यक्तीच्या संपर्कात आल्यास
२) विशिष्ट विषाणूजन्य आजार ज्या प्रदेशात आढळतात अशा ठिकाणी प्रवास केल्यास
३) असुरक्षित लैंगिक संबंध
४) रुग्णांना संक्रमित सुया वापरणे. तसेच संक्रमित व्यक्ती जांभई देते, शिंकते, खोकते किंवा अगदी बोलत असते, तेव्हा त्यांच्या जवळ असल्यास व्हायरस तुमच्या प्रणालीमध्ये प्रवेश करू शकतात.
विषाणूजन्य तापाचे काही गंभीर लक्षणे असतात.
लक्षणे :
१) थंडी वाजून ताप येणे
२) स्नायूंमध्ये वेदना आणि सांधेदुखी
३) डोकेदुखी ,
४) थकवा,
५) घसा खवखवणे, खोकला
६) सर्दी, नाक गळणे
७) चेहऱ्यावर सूज येणे
८) डोळे लाल होणे
९) मळमळ , उलटी
१०) सुस्ती
११ ) त्वचेवर लाल पुरळ येणे इ.व्हायरल तापाचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण लक्षण आहेत.
निदान
विषाणूजन्य तापाची लक्षणे बऱ्याच रोगांसाठी सामान्य असल्याने, तापाच्या विशिष्ट स्वरूपाचे निदान करणे कठीण असते.
CBC
रक्त, थुंकी आणि लघवी यांचा तपास.
निदानाची पुष्टी करण्यासाठी आणि डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया, तसेच आरटीपीसीआर व इतर टेस्ट केल्या जातात.
व्हायरल तापाची गुंतागुंत काय आहे?
विषाणू संसर्गासाठी कोणतेही प्रतिजैविक नाहीत. यावर केवळ सपोर्टिव ट्रीटमेंट दिली जाते, जसे की ताप असेल तर ताप कमी करणारी औषधे,
उलटी मळमळ असेल तर त्यावर औषधे, डेंग्यू सारख्या आजारात शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखणे व रक्तस्त्राव झाल्यास त्याचा वेळीच उपचार करणे इ. चा समावेश होतो.
सहसा, विषाणूजन्य ताप आठवडा किंवा दहा दिवसांत कमी होतो. तथापि, विषाणूजन्य तापाच्या गंभीर प्रकरणांमुळे गुंतागुंत होऊ शकते. उदा. निर्जलीकरण, मज्जासंस्थेतील बिघाड, यकृतावर किंवा मूत्रपिंड वर सूज, रक्तस्त्राव इ. अन्य गंभीर दुष्परिणाम होवू शकतात. म्हणून वेळीच काळजी घ्या. सतत ३, ४ दिवस ताप येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
डॉ. भाविक चांगोले
फिजिशिअन
व्हायरल ताप एक दृष्टीक्षेप
A Glance At Viral Fever
What is Viral Fever?
It is a viral infection that is characterised by high fever, headaches and bodyches.
What causes viral fever?
Air-borne infection
Water-borne infection.
Person-to-person
What are the symptoms of viral fever?
Headache
High fever
Body ache
Loss of appetite